Friday, February 12, 2010

माय नेम इज MAN , COMMON MAN

शालेय शिक्षण मराठी माध्यमातून झाल्याने, अनेक मित्रांनी माझ्या आंग्ल-भाषा कौशल्याविषयी प्रश्नचिन्ह उभे केले होते. तथापि वासरात लंगड़ी गाय शहाणी या उक्तिनुसार, घरातील हुशार मुलगा म्हणून मला घरी आलेल्या अतिथिसमोर उभे करून अल्फाबेट्स इत्यादि म्हणून दाखव असे म्हटले जायचे.


विचारणारा अतिथि पण आंग्ल-भाषा कौशल्यात माझ्या इतकात निपुण असल्यामुले तो फारफार झालेच तर WHAT IS YOUR NAME असे विचारायचा .
"माय नेम इज रमण ... लक्ष्मीरमण " असे तेव्हापासून म्हणावयाची सवय लागली.
आमच्या या बौद्धिक मालमत्तेचे निंद्य चौर्यकर्म करून टिमोथी डाल्टन आणि राजर मुर सारख्या अनेकांनी पोट भरले. पण असो...







आमचे शाळामास्तर प्राचीन समयी रसायनशास्त्र शिकवताना BOND साठी बंडू हा शब्दप्रयोग करत असत.
त्यांच्या असल्या पीजे प्रकारातील विनोदावर आम्ही हसावे असा त्यांचा दुराग्रह असे. काही कार्यकर्ता छाप विद्यार्थी, त्यांना खुश करण्यासाठी तसे करत असत.आम्ही मात्र त्यांची उत्तम मजा करत असू.
मला काही मित्र त्यांची नक्कल करावयास सांगत असत.
माय नेम इज बंडू .. कोव्हालेंट बंडू ... असे एकदा मी म्हणत होतो.
ते म्हणताना त्यांनी ऐकलं आणि ते प्रचंड तापले होते...
तात्पर्य हे की तेव्हापासून "माय नेम इज -पुढे काहीही असो " त्याच्या वाटेस गेलो नाही.
आजकाल "माय नेम इज MAN , COMMON MAN असे म्हणत असतो.